Friday, April 24, 2009

मराठीतली भाषावैज्ञानिक चर्चा, नियतकालिकं इ.

सुबोध:     शब्दांचे वर्गीकरण ह्या विषयावर अर्जुनवाडकरांच्या मांडणीनंतर काही
काम झाले आहे का
               चर्चा, वाद वगैरे....
 सुशान्त: उमाकांत कामतांची काही व्याख्यानं आणि लेख आहेत
                       पण त्यांचा विषय व्यापक आहे.
 सुबोध:            इंग्रजीत जर्न्लस असतात, परिषदांमध्ये लेख छापून वाचले जातात
तश्या प्रकारचे काही?
 सुशान्त: फारसे नाही.
 सुबोध:           एक व्यासपीठ पाहिजे जिथे अशा विषयांवरची चर्चा चालू ठेवता येईल व
त्यावर तज्ञ आणि सर्वसामान्य असे दोघेही आपली मते मांडतील आणि
                       त्याला खास असा दर्जा असेल व त्याची दखल घेतली जाईल.
 सुशान्त:   मराठीत भाषा आणि जीवन आहे,
                तिथेच थोडीशी चर्चा होते पण तड लागेल अशा वैचारिक मारामाऱ्या नाही होत.
                तज्ज्ञांचे घटापटाचे वाद होतील असं नियतकालिक नाहीए.
                होती ती वारली
                किंवा घरघरत आहेत.
                आजचा सुधारक आहे चांगलं,
                पण विशिष्ट ज्ञानशाखेला वाहिलेलं असं नाहीए.

 सुबोध:   भाषा आणि जीवनची दखल विद्यापिठीय संशोधनात कितपत घेतली जाते ?
               पूर्वी तू मायबोलीवरची एक चर्चा धाडली होतीस...मराठीतील नकारदर्शक
क्रियापदांवरची...ती चर्चा व संबंधित इतर लेख जर
               भाषा आणि जीवन मध्ये छापले तर विद्यापिठीय संशेधनात त्याची दखल कितपत
घेतली जाईल?
               किंवा तुझे गणांचे काम कुठे छापशील की ज्यामुळे त्यावर चर्चा होईल व
त्याची दखल इतर संबंधित अशा संशोधनात घेतली जाईल?
सुशान्त: खरं तर आपल्याकडे नियतकालिकं निघतात
            पण तीही इंग्रजीत ! उदा.  इंडियन लिंग्विस्टिक्स्
            विविध विद्यापीठांची नियतकालिकं प्रथम बहुभाषिक व्हायला हवीत
            तिथे विद्वानांना त्यांच्या मातृभाषेत लिहियला भाग पाडलं पाहिजे
            काही काळ अशी सक्ती आवश्यक आहे